|
|
| ४३. इंद्रजिताचा वध |
|
रूपाने देखनी अशी नागकन्या इंद्रजिताची राणी होती. त्या इंद्रजिताचा वध लक्ष्मणाच्या बाणाने झाला. त्यावेळी इंद्रजिताचा सर्व गर्व उतरून गेला. अशा प्रकारे इंद्रजिताचा दारूण पराभव झाल्यावर रामाने लंकेच्या रावणाचाही वध केला. आणि लंकेच्या गादीवर विभीषणाची नियुक्ती करून राम सीतेला घेउन अयोध्येच्या दिशेने निघाले. |
| |
आणिरे रावणाचे पूत्र दोघे ऽऽऽ रावणाचे पूत्र दोघे ऽऽऽ मेघ जगजीवन ऽऽऽ मेघ जगजीवन दोघे मेघ जगजीवन ऽऽऽ आणिरे दशरथाचे पूत्र दोघे ऽऽऽ दशरथाचे पूत्र दोघे ऽऽऽ राम लक्ष्मण ऽऽऽ राम लक्ष्मण दोघे राम लक्ष्मण ऽऽऽ आणिरे चौघासी झगडे झाले हो ऽऽऽ चौघासी झगडे झाले सुरती ऐका चित्त देवून ऽऽऽ ऐका चित्त देवून सुरती ऐका चित्त देवून ऽऽऽ आ णिरे स्वरूप सुंदरा नागकन्या ऽऽऽ स्वरूप सुंदरा नागकन्या ऽऽऽ इंद्रजिताची राणी ऽऽऽ इंद्रजिताची राणी राया इंद्रजिताची राणी ऽऽऽ आणिरे तोच इंद्रजित बळी पडला ऽऽऽ तोच इंद्रजित बळी पडला ऽऽऽ
लक्ष्मणाच्या बाणी ऽऽऽलक्ष्मणाच्या बाणी पडला लक्ष्मणाच्या बाणी ऽऽऽ
आणिरे छेदलासे परीभरम ऽऽऽ छेदलासे परीभरम ऽऽऽ लागून पडला भूमी ऽऽऽ लागून पडला भूमी बाण लागून पडला भूमी ऽऽऽ मारीला लंकेच्या रावणा ऽऽ मारीला लंकेच्या रावणा ऽऽ इंद्रजिता दारूण ऽऽ वधिला इंद्रजिता दारूण ऽऽ स्थापियले विभीषणा ऽऽ राज्या स्थापियले विभीषणा ऽऽ राम निघाले ऽ निघाले काय अयोध्येशी ॥ राम निघाले ऽ निघाले काय अयोध्येशी ॥ हर हर गाईन पवित्र श्री रामायण ॥ हर हर गाईन रामायण काय जन्मयोगे ॥ |
|
|
| |
| ४४. सीता परीक्षा |
| सीता रावणाकडे बंदिवासात बरेच दिवस राहिल्यामुळे कैकयी, कौसल्या व सुमित्रेने तीच्या चारित्र्याची परीक्षा घ्यायची ठरविली. त्यांनी तूं आमची मोठी सून असून श्रीरामाच्या मागे तूं आम्हांला मान देशिल. परंतु हे जरी खरे असले तरी तुझी चारीत्र्य परीक्षा पाहण्यासाठी तूं आम्हांला रावणाचे रूप लिहून दे. असे सांगितले. त्यावेळी सुडळाचा कागद व सुडळाची दउत घेवून सीतेने रावणाचे चित्र लिहून दिले. परंतु त्यावेळी तीच्या मनात कोणतेही कपट त्यांना दिसून आले नाही. अशा प्रकारे सीता सत्व परीक्षेला उतरली. |
| |
आणिरे केग आणि कौसल्या ऽऽऽ केग आणि कौसल्या ऽऽऽ सुमित्रा तिघी जनी ऽऽऽ सुमित्रा तिघी जनी राया सुमित्रा तिघी जनी ऽऽऽ आणिरे वडील सून तूं बाई माझी ऽऽऽ वडील सून तूं बाई माझी ऽऽऽ सुग्राव चांगला ऽऽऽ सुग्राव चांगला राया सुग्राव चांगला ऽऽऽ आणिरे श्रीरामाच्या मागे जानकी ऽऽऽ श्रीरामाच्या मागे जानकी ऽऽऽ मानसी आम्हांला ऽऽऽ मानसी आम्हांला जानकी मानसी आम्हांला ऽऽऽ आणिरे रावणाचे स्वरूप सीते ऽऽऽ रावणाचे स्वरूप सीते ऽऽऽ लिहून दे आम्हांला ऽऽऽ लिहून दे आम्हांला सीते लिहून दे आम्हांला ऽऽऽ आणिरे सुडळाचा कागद लेखणी ऽऽऽ सुडळाचा कागद लेखणी ऽऽऽ सुडळाची दऊत ऽऽऽ सुडळाची दऊत लेखणी सुडळाची दऊत ऽऽऽ आणिरे चित्र लिहिती झाली जानकी ऽऽऽ चित्र लिहिती झाली जानकी ऽऽऽ कपट नाय मनी ऽऽऽ कपट नाय मनी राया कपट नाय मनी ऽऽऽ
आणिहो भरली चित्र शाळा हो ऽऽऽ भरली चित्र शाळा सीतेने रूप दिले लिहूनी ऽऽऽ रूप दिले लिहूनी राया रूप दिले लिहूनी ऽऽऽ हर हर गाईन पवित्र श्री रामायण ॥ हर हर गाईन रामायण काय जन्मयोगे ॥ |
|
| |
|
| |
| इ ती फा ग रा मा य ण स मा प्त |
|
|
|
|
| |
|
|