|
|
| ५२. कृष्ण म्हणे सुदामा राया |
| |
कृष्ण म्हणे सुदामा राया ऽऽऽ आता मी निघालो वनाला हो ऽऽऽ
निघालो वनाला आता मी निघालो वनाला ऽऽऽ बारा वर्षे वृक्ष पाळीला हो तवरीत ऽऽ बारा वर्षे वृक्ष पाळीला हो तवरीत ऽऽ त्या बा वृक्षा लागे भार ऽऽऽ वृक्ष दिसे मोठा दिलभार हो ऽऽऽ दिसे मोठा दिलभार वृक्ष दिसे मोठा दिलभार ऽऽऽ त्याला त्रिभुवनी फळ हो पुसवे आले ऽऽ त्याला त्रिभुवनी फळ हो पुसवे आले ऽऽ त्याला फुटून आले फळ हो गगणा एवढे ऽऽ त्याला फुटून आले फळ हो गगणा एवढे ऽऽ देठ सुर्याचे मंडळी की आले वैकुंठा लागोनी हो ऽऽऽ वैकुंठा लागोनी ऽ आले वैकुंठा लागोनी ऽऽऽ हर हर सुर्याचे मस्तकी मंत्र जपून राहिला कोण ॥ हर हर सुर्याचे मस्तकी मंत्र जपून राहिला कोण ॥ हर हर पित्याचे मस्तकी मंत्र जपून राहिला कोण ॥ हर हर पित्याचे मस्तकी मंत्र जपून राहिला कोण ॥ हर हर तो कान्हा अवतरला गोकुळामधी ॥ हर हर तो कान्हा अवतरला गोकुळामधी ॥ |
|
|
| |
५३. कौसल्यामाळी |
| एका रात्री कौसल्यामाळी म्हणजेच श्रीकृष्ण, गवळ्यांसारखे कपडे घालून निघाला. व वाटेत त्याने माझे नांव राई आहे व मला राई म्हणूनच हांक मारा असे सवंगड्यांना सांगितले. जातांना दिवट्याच्या प्रकाशात तो चंद्रावळी गौळणीच्या घरी पोहोचला. त्याने तीला तुझी तब्बेत बरी नाही म्हणून मी तुझी विचारपुस करायला आलो आहे असे सांगितले.पण तुझी विचारपुस राहू दे. माझ्या सर्वांगाला घाम आला आहे. आणि मी उल्हासित झालो आहे. म्हणून आपण पलंगावर बसू व दोन सुख दु:खाच्या गोष्टी करू. त्या प्रमाने दोघे पलंगावर बसली. गोष्टी करता करता त्याचे लक्ष पायाकडे गेले. त्यावेळी त्याला तळव्या एवढे पद्म दिसले. हे पद्म म्हणजे काय हे तुम्ही ओळखा. अशा प्रकारे तो तिच्या बरोबर लिला करू लागला. व तिचा उपभोग घेवू लागला. |
| |
आणिरे नीट न्हेसला कौसल्यामाळी ऽऽऽ नीट न्हेसला कौसल्यामाळी ऽऽऽ आपून राय झाला ऽ आपून राय झाला माळी आपून राय झाला ऽऽऽ आणिरे मार्गी चालता बोले सखयांना ऽऽऽ मार्गी चालता बोले सखयांना ऽऽऽ राई म्हणा मजला ऽ राई म्हणा मजला राया राई म्हणा मजला ऽऽऽ
आणिरे चंद्रावळीच्या महाली पोचला ऽऽऽ चंद्रावळीच्या महाली पोचला ऽऽऽ
दिवटे जाळीत गेला ऽदिवटे जाळीत गेला राया दिवटे जाळीत गेला ऽऽऽ
आणिरे काय वाटे तुझ्या जिवाला ऽऽऽ काय वाटे तुझ्या जिवाला ऽऽऽ आलो पुसायला ऽ आलो पुसायला म्हणून मी आलो पुसायला ऽऽऽ
राई जळो गे तुझा खेम ऽऽ राई जळो गे तुझा खेम ऽऽ सर्वांगा आला घाम ऽऽ माझ्या सर्वांगा आला घाम ऽऽ राई चल जाउ ऽ पलंगावर दोन गोष्टी करू ॥ राई चल जाउ ऽ पलंगावर दोन गोष्टी करू ॥ आणिरे पलंगावरी बसले हरी ऽऽऽ पलंगावरी बसले हरी ऽऽऽ मगे बुध विचारी ऽ मगे बुध विचारी राया मगे बुध विचारी ऽऽऽ आणिरे पाय पक्षाळीता हो ऽ पाय पक्षाळीता पद्म देखिले तळव्यापरी ऽऽऽ देखिले तळव्यापरी पद्म देखिले तळव्यापरी ऽऽऽ पद्म कशाचे तळव्यापरी ऽऽ पद्म कशाचे तळव्यापरी ऽऽ सांगून द्यावे झडकरी ऽऽ एवढे सांगून द्यावे झडकरी ऽऽ हर हर तो कान्हा आनंदे भोगिता झाला ॥ हर हर तो कान्हा आनंदे भोगिता झाला ॥ हर हर तो कान्हा आनंदे खेळता झाला ॥ हर हर तो कान्हा आनंदे खेळता झाला ॥ हर हर तो कान्हा अवतरला गोकुळामधी ॥ हर हर तो कान्हा अवतरला गोकुळामधी ॥ |
|
| |
|
|
|
|
| |
|
|