|
|
| |
आणिहो ऐका कंसे वधा हो ऽऽऽ ऐका कंसे वधा गोकुळी जनमले गोविंद ऽऽऽ जनमले गोविंद ऽ गोकुळी जनमले गोविंद ऽऽऽ आणिहो गोकुळी अवतरला हो ऽऽऽ गोकुळी अवतरला सकळीक जनासी आनंद झाला ऽऽऽ जनासी आनंद झाला ऽ सकळीक जनासी आनंद झाला ऽऽऽ सकळीक जनासी आनंद झाला महाथोर ऽऽ सकळीक जनासी आनंद झाला महाथोर ऽऽ त्याचा प्रतिपाळ केला मावशेन ऽऽ त्याचा प्रतिपाळ केला मावशेन ऽऽ कृष्ण पुसे यशोदा मावशेला बये मी येकाचा येकला हो ऽऽऽ
येकाचा येकला ऽ बये मी येकाचा येकला ऽऽऽ
माझे नाय गे पाठीवर आणि कोण ऽऽ माझे नाय गे पाठीवर आणि कोण ऽऽ पूत्रा बोलता नये रे आज तो तरी कंस करी राज हो ऽऽऽ कंस करी राज तो तरी कंस करी राज ऽऽऽ त्याने वधीयेली सहाहो सातीव बाळे ऽऽ त्याने वधीयेली सहाहो सातीव बाळे ऽऽ त्याने दौडीयेले आम्हां ह्या ठायाला ऽऽ त्याने दौडीयेले आम्हां ह्या ठायाला ऽऽ पूत्रा बोलता नये रे आम्हां तो तरी कंस तुझा मामा हो ऽऽऽ कंस तुझा मामा तो तरी कंस तुझा मामा ऽऽऽ मावशे सांग गे कंसाचे मरण आतां ऽऽ मावशे सांग गे कंसाचे मरण आतां ऽऽ पूत्रा नाही त्यासी मरण त्याला मारील हा कोण हो ऽऽऽ मारील हा कोण त्याला मारील हा कोण ऽऽऽ पूत्रा नाही त्यासी मरण त्याला मारील नारायण हो ऽऽऽ मारील नारायण ऽ त्याला मारील नारायण ऽऽऽ खरग आहे जीवन मरण त्याचे ऽऽ खरग आहे जीवन मरण त्याचे ऽऽ एवढी ऐकोनी या मात ऽ एवढी ऐकोनी या मात ऽ मन केले बा सावचित ऽ कृष्णान मन केले बा सावचित ऽ चुडे घडीवले घडीवले काय नवरत्नांचे ॥ चुडे घडीवले घडीवले काय नवरत्नांचे ॥ चुडे घडवून नाना परी हो दुरड्या भरल्या ऽऽ चुडे घडवून नाना परी हो दुरड्या भरल्या ऽऽ दुरड्या भरीयेल्या चार नाना परी ऽऽ दुरड्या भरीयेल्या चार नाना परी ऽऽ कृष्णान घेतला अभ्यास कावडे भरीयेले चार हो ऽऽऽ भरीयेले चार ऽ कावडे भरीयेले चार ऽऽऽ कावडे भरीयेले चार नाना परी ऽऽ कावडे भरीयेले चार नाना परी ऽऽ कृष्ण गेला वयले नगरी तो बाळ बाजारी उतरला हो ऽऽऽ बाजारी उतरला ऽ तो बाळ बाजारी उतरला ऽऽऽ चाली चालत असे फाकडा ऽऽ चाली चालत असे फाकडा ऽऽ बोलत असे बोबडा ऽऽ बोली बोलत असे बोबडा ऽऽ खेळत असे बावरा ऽऽ खेळ खेळत असे बावरा ऽऽ अभंग ही कळा ऽऽ देवाची अभंग ही कळा ऽऽ कृष्ण मायेचा मायेचा हो वैराळ झाला ॥ कृष्ण मायेचा मायेचा हो वैराळ झाला ॥ कृष्ण मायेचा वैराळ झाला हो ऽ मायेचा वैराळ झाला तो बाळ नगरी उतरला ऽऽऽऽ नगरी उतरला ऽ तो बाळ नगरी उतरला ऽऽऽऽ चुडे ल्या असा बोलला हो नगरच्या नारी ऽऽ चुडे ल्या असा बोलला हो नगरच्या नारी ऽऽ तुझ्या चुड्याचा महिमा थोर बाहेर आली हो कमळाराणी हो ऽऽऽऽ आली हो कमळाराणी ऽ बाहेर आली हो कमळाराणी ऽऽऽऽ बैस बैस रे बा वैराळा ऽऽ बैस बैस रे बा वैराळा ऽऽ रूप दिसे आगळा ऽऽ तुझे रूप दिसे आगळा ऽऽ दिसतसे सांवळा ऽऽ तूं बाळ दिसतसे सांवळा ऽऽ काय मोल तुझ्या चुड्याचे बा सांग आतां ॥ काय मोल तुझ्या चुड्याचे बा सांग आतां ॥ माझे चुडे भरा चुकट मजला दाम द्यावा नीट हो ऽऽऽ दाम द्यावा नीट ऽ मजला दाम द्यावा नीट ऽऽऽ नारीने मग दिधलासे हात हो ऽ दिधलासे हात वैराळ चुडे भरीतां झाला ऽऽऽ चुडे भरीतां झाला ऽ वैराळ चुडे भरीतां झाला ऽऽऽ कळा मग लाविली दाटून हो ऽ लाविली दाटून खरग आलो विसरून ऽऽऽ आलो विसरून ऽ खरग आलो विसरून ऽऽऽ माझे चुडे झाले घणदाट हो ऽ चुडे झाले घणदाट पतीचे खरग दे आणून ऽऽऽ खरग दे आणून ऽ पतीचे खरग दे आणून ऽऽऽ नार मग उठली हांसत हो ऽ उठली हांसत पतीच्या उषा घातला हात ऽऽऽऽ उषा घातला हात ऽ पतीच्या उषा घातला हात ऽऽऽऽ खरग सांपडले अवचित हो तय्यावेळी ऽऽ खरग सांपडले अवचित हो तय्यावेळी ऽऽ खरग दिले वैराळा हाती की वैराळ बोले दटाउनी हो ऽऽऽऽ बोले दटाउनी ऽ की वैराळ बोले दटाउनी ऽऽऽऽ मी तरी वैराळ नव्हे आता मी तरी सखा तुझा भाचा हो ऽऽऽऽ सखा तुझा भाचा ऽ मी तरी सखा तुझा भाचा ऽऽऽऽ जाउनी उठव गे मामी त्या मामाला ऽऽ जाउनी उठव गे मामी त्या मामाला ऽऽ जाउनी उठव गे आपुल्या पतीला ऽऽ जाउनी उठव गे आपुल्या पतीला ऽऽ नार मग मनी झाली दु:खीत स्वामी उठा हो ऐका मात हो ऽऽऽऽ उठा हो ऐका मात ऽ स्वामी उठा हो ऐका मात ऽऽऽऽ आणिहो नीजेच्या अवसरी हो ऽ नीजेच्या अवसरी पाहिला मथूरेचा हरी ऽऽऽऽ मथूरेचा हरी ऽ पाहिला मथूरेचा हरी ऽऽऽऽ चुडे भरोनी नाना परी हो खरग नेले ऽऽ चुडे भरोनी नाना परी हो खरग नेले ऽऽ एवढी ऐकोनी या मात ऽऽ एवढी ऐकोनी या मात ऽऽ मन केले बा सावचित ऽऽ कंसान मन केले बा सावचित ऽऽ सजिवलेसे दरबार ऽऽ कंसान सजिवलेसे दरबार ऽऽ चालला श्रीकृष्णा सामोरी काय युध्द खेळा ॥ चालला श्रीकृष्णा सामोरी काय युध्द खेळा ॥ कंस बोले रे सैन्याला भोवते वेढा रे मुरारी हो ऽऽऽऽ वेढा रे मुरारी ऽ भोवते वेढा रे मुरारी ऽऽऽऽ मधे घालोनी मुरारी मार मारा ऽऽ मधे घालोनी मुरारी मार मारा ऽऽ कृष्ण आपण नारायण करीतसे अष्टासन निर्धार हो ऽऽऽऽ अष्टासन निर्धार ऽ करीतसे अष्टासन निर्धार ऽऽऽऽ खरग मंत्रोण सोडीले हो सैन्यावरी ऽऽ खरग मंत्रोण सोडीले हो सैन्यावरी ऽऽ सारे सैन्य झाले संहार कंस उरलासे निर्धार हो ऽऽऽऽ उरलासे निर्धार कंस उरलासे निर्धार ऽऽऽऽ कृष्णान चुकून हात मारीला कंस धरणीवर पडला हो ऽऽऽऽ धरणीवर पडला ऽ कंस धरणीवर पडला ऽऽऽऽ गुडघे देवूनी उरस्थळी हो वर बैसला ऽऽ गुडघे देवूनी उरस्थळी हो वर बैसला ऽऽ आता दमधर रे मामा काढीतो भावांचे उसणे हो ऽऽऽऽ बहिणींचे उसणे ऽ फेडीतो भावांचे उसणे ऽऽऽऽ नको मारू रे माझ्या भाच्या ऽऽ नको मारू रे माझ्या भाच्या ऽऽ पोटची रे कन्या ऽऽ देईन पोटची रे कन्या ऽऽ देईन पोटची कन्या रे भाच्या शरण आलो ॥ देईन पोटची कन्या रे भाच्या शरण आलो ॥ कृष्ण ऐकेनासा झाला हो ऽ ऐकेनासा झाला शिर मामाचे घेउन गेला ऽऽऽऽ मामाचे घेउन गेला ऽ शिर कंसाचे घेउन गेला ऽऽऽऽ कृष्ण यशवंत झाला हो ऽ यशवंत झाला अपुल्या मंदिरासी आला ऽऽऽऽ मंदिरासी आला ऽ अपुल्या मंदिरासी आला ऽऽऽऽ हर हर तो कान्हा अवतरला गोकुळामधी ॥ हर हर तो कान्हा अवतरला गोकुळामधी ॥ |
|
|
| |
| *पुढील सर्व भागांमधे श्रीकृष्ण लिला आढळतील. |
४८.चंद्रावळी नार |
|
चंद्रसेन नांवाच्या गवळ्याची पत्नी अतीशय देखणी होती. तीने वेणीमधे फुले माळून व चादीच्या तक्क्यावर बसून डेर्यामधे दह्याचे घुसळन घालून रुवयेच्या दोरीने ऑढत होती. अचानक रुवयेची दोरी तुटली व ती नार धरणीवर पडणार तोच जवळ असलेल्या तीच्या मैत्रिणींनी तिला वरचेवर धरले. परंतु ह्या प्रकाराने घाबरून चंद्रावळी बेशुध्द पडली. त्यावेळी वैध्य म्हणून श्रीकृष्णाला बोलावण्यात आले. कृष्ण खांध्यावर काळी घोंगडी घेवून आला. त्याने चंद्रावळी भोवती आडवे आठ पडदे बांधून तीचे वीष उतरविले. व तिच्या बरोबर खेळून तीचा उपभोग घेतला. |
| |
| राया चंद्रसेनाच्या घरी नार एक चंद्रावळी सुंदर हो ऽऽऽ चंद्रावळी सुंदर नार एक चंद्रावळी सुंदर ऽऽऽ फुले माळून हो ऽ फुले माळून गा ऽ माळून माथ्यावर ऽ हो फुले माळून गा ऽ माळून माथ्यावर बैसली रूप्याच्या चवयवर ऽऽऽ फुले माळून माथ्यावर बैसली रूप्याच्या चवयवर ऽऽऽ डेरे भरोनी हो ऽ डेरे भरोनी गा ऽ भरोनीया रांजन ऽ हो डेरे भरोनी गा ऽ भरोनीया रांजन नारीने घुसळण घातले ऽऽऽ डेरे भरोनीया रांजन नारीने घुसळण घातले ऽऽऽ घुसळण घालून हो ऽ घुसळण घालून गा ऽ घालूनीया रांजणा ऽ हो घुसळण घालून गा घालूनीया रांजणा ओढी रूवयेच्या दोर्या ऽऽऽ घुसळण घालूनीया रांजणा ओढी रूवयेच्या दोर्या ऽऽऽ तुटल्या रूवयेच्या ऽ तुटल्या रूवयेच्या ऽ रुवयेच्या दोर्या ऽ हो तुटल्या रूवयेच्या ऽ रुवयेच्या दोर्या ती नार पडली धरणीवर ऽऽऽ तुटल्या रुवयेच्या दोर्या ती नार पडली धरणीवर ऽऽऽ जवळ होत्या हो ऽ जवळ होत्या गा ऽ होत्या सख्या वसैया ऽ हो जवळ होत्या गा ऽ होत्या सख्या वसैया नारीला वरचेवर उचलीले ऽऽऽ जवळ होत्या सख्या वसैया नारीला वरचेवर उचलीले ऽऽऽ नगरी फेरावा ऽ नगरी फेरावा ऽ फेरावा हुंकार ऽ हो नगरी फेरावा ऽ फेरावा हुंकार कोणी वैद्य बोलवा ऽऽऽ नगरी फेरावा हुंकार कोणी वैद्य बोलवा ऽऽऽ कान्हा मथुरेचा ऽ कान्हा मथुरेचा ऽ मथुरेचा हरी ऽ हो कान्हा मथुरेचा ऽ मथुरेचा हरी वैद्य आणा बोलावूनी ऽऽऽ कान्हा मथुरेचा हरी वैद्य आणा बोलावूनी ऽऽऽ खांदे वाहूनी हो ऽ खांदे वाहूनी गा ऽ वाहूनी काळी कांबळी ऽ हो खांदे वाहूनी गा ऽ वाहूनी काळी कांबळी हाती घेवून चाबूक दोरी ऽऽऽ खांदे वाहूनी काळी कांबळी हाती घेवून चाबूक दोरी ऽऽऽ आड्वे आठ पडदे ऽ आड्वे आठ पडदे ऽ आठ पडदे बांधून ऽ हो आड्वे आठ पडदे ऽ आठ पडदे बांधून नारीचे विष हो उतरीले ऽऽऽ आडवे आठ पडदे बांधून नारीचे विष हो उतरीले ऽऽऽ हर हर तो कान्हा आनंदे खेळता झाला ॥ हर हर तो कान्हा आनंदे खेळता झाला ॥ हर हर तो कान्हा आनंदे भोगता झाला ॥ हर हर तो कान्हा आनंदे भोगता झाला ॥ हर हर तो कान्हा अवतरला गोकुळामधी ॥ हर हर तो कान्हा अवतरला गोकुळामधी ॥ |
|
| |
|
|
|
|
| |
|
|