|
|
देवी लज्जीत होउन गेल्या अपुल्या मंदिरासी आल्या हो ऽऽऽ मंदिरासी आल्या ऽ अपुल्या मंदिरासी आल्या ऽऽऽ देवी बोलती हो ऽ देवी बोलती गा ऽ बोलती आपल्या पतींना ऽ हो देवी बोलती गा ऽ बोलती आपल्या पतींना अनुसयेचे सत्त्व हराया ऽऽऽ देवी बोलती आपल्या पतींना अनुसयेचे सत्त्व हराया ऽऽऽ देव पुसती हो ऽ देव पुसती गा ऽ पुसती तिन्ही देवींना ऽ हो देव पुसती गा ऽ पुसती तिन्ही देवींना सत्त्व कैसे हरावे ऽऽऽ देव पुसती तिन्ही देवींना सत्त्व कैसे हरावे ऽऽऽ तिघे होउनी हो ऽ तिघे होउनी गा ऽ होउनीया भिकारी ऽ हो तिघे होउनी गा ऽ होउनीया भिकारी जावे अनुसये द्वारी ऽऽऽ तिघे होउनीया भिकारी जावे अनुसये द्वारी ऽऽऽ कमंडलूभर वाळू हो ऽ कमंडलूभर वाळू गा ऽ वाळू हो घेवून ऽ हो कमंडलूभर वाळू गा ऽ वाळू हो घेवूनी मागावे अन्न हो शिजवूनी ऽऽऽ कमंडलूभर वाळू हो घेवूनी मागावे अन्न हो शिजवूनी ऽऽऽ विवस्र होउनी हो ऽ विवस्र होउनी गा ऽ होउनीया हे अन्न ऽ हो विवस्र होउनी गा ऽ होउनीया हे अन्न भरव आम्हां तिघांना ऽऽऽ विवस्र होउनीया हे अन्न भरव आम्हां तिघांना ऽऽऽ तिन्ही देव निघाले ऽ तिन्ही देव निघाले ऽ निघाले तेथून ऽ हो तिन्ही देव निघाले ऽ निघाले तेथून भिकारी याचक बनून ऽऽऽ तिन्ही देव निघाले तेथून भिकारी याचक बनून ऽऽऽ भिक्षा वाढी गे ऽ भिक्षा वाढी गा ऽ वाढी गे सुंदरी ऽ हो भिक्षा वाढी गा ऽ वाढी गे सुंदरी असे ते याचक बोलती ऽऽऽ भिक्षा वाढी गे सुंदरी असे ते याचक बोलती ऽऽऽ अनुसया सत्त्वाची ऽ अनुसया सत्त्वाची ऽ सतवाची सुंदरा ऽ हो अनुसया सत्त्वाची ऽ सतवाची सुंदरा झडकरी आली बाहेर ऽऽऽ अनुसया सतवाची सुंदरा झडकरी आली बाहेर ऽऽऽ याचका धरोनी हो ऽ याचका धरोनी गा ऽ धरोनी दोन्ही करी ऽ हो याचका धरोनी गा ऽ धरोनी दोन्ही करी बैसविले मंचकावरी ऽऽऽ याचका धरोनी दोन्ही करी बैसविले मंचकावरी ऽऽऽ शंकर बोले हो ऽ शंकर बोले गा ऽ बोले अनुसयेला ऽ हो शंकर बोले गा ऽ बोले अनुसयेला वाळूचे भोजन दे शिजवूनी ऽऽऽ शंकर बोले अनुसयेला वाळूचे भोजन दे शिजवूनी ऽऽऽ ब्रम्हा बोले हो ऽ ब्रम्हा बोले गा ऽ बोले अनुसयेला ऽ हो ब्रम्हा बोले गा ऽ बोले अनुसयेला विवस्र भरव अन्न आम्हां ऽऽऽ ब्रम्हा बोले अनुसयेला विवस्र भरव अन्न आम्हां ऽऽऽ विष्णू बोले हो ऽ विष्णू बोले गा ऽ बोले अनुसयेला ऽ हो विष्णू बोले गा ऽ बोले अनुसयेला नाहीतर जातो आमच्या मार्गाला ऽऽऽ विष्णू बोले अनुसयेला नाहीतर जातो आमच्या मार्गाला ऽऽऽ आणिहो अनुसये मातेला हो ऽऽऽऽ अनुसये मातेला नी चिंता पडली गे साजनी ऽऽऽऽ पडली गे साजनी नी चिंता पडली गे साजनी ऽऽऽऽ आणिहो बावांच्या ह्या अटी हो ऽऽऽऽ बावांच्या ह्या अटी नी आता पुर्ण करू कयशी ऽऽऽऽ पुर्ण करू कयशी ऽ अटी पुर्ण करू कयशी ऽऽऽऽ आणिहो पतिव्रता अनुसया हो ऽऽऽऽ पतिव्रता अनुसया टळेना आपुल्या सत्त्वाला ऽऽऽऽ आपुल्या सत्त्वाला टळेना सतीच्या धर्माला ऽऽऽऽ आणिहो गंगाजल घेउनी हो ऽऽऽऽ गंगाजल घेउनी शिंपडीले तिन्ही याचकांवरी ऽऽऽऽ तिन्ही याचकांवरी ऽ शिंपडीले तिन्ही याचकांवरी ऽऽऽऽ आणिहो सती धर्माची किमया न्यारी ऽऽऽऽ सती धर्माची किमया न्यारी ऽऽऽऽ झाली तिन्ही देव बाळे ऽ झाली तिन्ही देव बाळे राया झाली तिन्ही देव बाळे ऽऽऽऽ आणिहो आनंदाने स्तनपान करी ऽऽऽऽ आनंदाने स्तनपान करी ऽऽऽऽ भोजनही भरविले ऽ भोजनही भरविले कुषीमधे भोजनही भरविले ऽऽऽऽ आणिहो पाळण्यामधे ठेवून देवांना ऽऽऽऽ पाळण्यामधे ठेवून देवांना ऽऽऽऽ झोका जो काय देई ऽ झोका जो काय देई अनुसया झोका जो काय देई ऽऽऽऽ आणिहो बातमी कळली त्या देवींना ऽऽऽऽ बातमी कळली त्या देवींना ऽऽऽऽ लोटांगण घालती ऽ लोटांगण घालती चरणी लोटांगण घालती ऽऽऽऽ आणिहो त्रिदेवींना अनुसया बोले ऽऽऽऽ त्रिदेवींना अनुसया बोले ऽऽऽऽ घेउन जा पतींना ऽ घेउन जा पतींना आपापल्या घेउन जा पतींना ऽऽऽऽ आणिहो हात जोडूनी विनवीती देवी ऽऽऽऽ हात जोडूनी विनवीती देवी ऽऽऽऽ नाही कधी मातनार ऽ नाही कधी मातनार माते नाही कधी मातनार ऽऽऽऽ आणिहो पती दे आम्हां पुर्व स्वरूपी ऽऽऽऽ पती दे आम्हां पुर्व स्वरूपी ऽऽऽऽ हिच एक विनवणी ऽ हिच एक विनवणी चरणी हिच एक विनवणी ऽऽऽऽ घेतले गंगाजल हो हाती ऽऽ घेतले गंगाजल हो हाती ऽऽ शिंपडीले देवांवरी ऽऽ तिन्ही शिंपडीले देवांवरी ऽऽ आणिहो सती धर्माचा पहा महिमा ऽऽऽऽ सती धर्माचा पहा महिमा ऽऽऽऽ स्वरूप मिळाले देवांना ऽ स्वरूप मिळाले देवांना पुर्व स्वरूप मिळाले देवांना ऽऽऽऽ सत्व परीक्षा जिंकून ऽऽ सत्व परीक्षा जिंकून ऽऽ मिळविला सन्मान ऽऽ अनुसयेने मिळविला सन्मान ऽऽ सती अनुसया महासती काय चौदालोकी ॥ सती अनुसया महासती काय चौदालोकी ॥ |
|
|
| |
वि भा ग प हि ला स मा प्त |
| |
|
|
|
|
|
| |
|
|