आरती व झुलवे  
घुमटाच्या तालावर म्हणायच्या इत्तर आरत्या
५. हेची दान देगा देवा
हेची दान देगा देवा ऽ हेची दान देगा देवा ऽ
तुझा विसर न व्हावा ऽऽऽ तुझा विसर न व्हावा ऽ
विसर न व्हावा ऽ तुझा विसर न व्हावा ऽऽऽ
गुण गाईन आवडी ऽ गुण गाईन आवडी ऽ
हेची माझी सर्व गोडी ऽऽऽ हेची माझी सर्व गोडी ऽ
माझी सर्व गोडी ऽ हेची माझी सर्व गोडी ऽऽऽ
न लगे मुक्ती धन संपदा ऽ न लगे मुक्ती धन संपदा ऽ
संत संग देई सदा ऽऽऽ संत संग देई सदा ऽ
संग देई सदा ऽ संत संग देई सदा ऽऽऽ
तुका म्हणे गर्भवासी ऽ तुका म्हणे गर्भवासी ऽ सुखे घालावे आम्हांसी ऽऽऽ
सुखे घालावे आम्हांसी ऽ घालावे आम्हांसी ऽ सुखे घालावे आम्हांसी ऽऽऽ

 
६. ॐ नमो गणराया
ॐ नमो गणराया ऽऽऽ ॐ नमो गणराया ऽऽऽ
गण गौरीच्या कुंवरा ऽऽऽ गण गौरीच्या कुंवरा ऽऽऽ
वर्ण पाहिला तुझा एकदंत ऽऽऽ गणेशा वर्ण पाहिला तुझा एकदंत ऽऽऽ
अहो एकदंत तुझा ऽऽऽ अहो एकदंत तुझा ऽऽऽ
गण सोन्याने मढविला ऽऽऽ गण सोन्याने मढविला ऽऽऽ
धोंदम्या रोविला नाग बंध ऽऽऽ गणेशा धोंदम्या रोविला नाग बंध ऽऽऽ
अहो नागबंध वेढा ऽऽऽ अहो नागबंध वेढा ऽऽऽ
गण शेंदुराची उटी ऽऽऽ गण शेंदुराची उटी ऽऽऽ
कस्तुरी लल्लाटी रेखियेल्या ऽऽऽ गणेशा कस्तुरी लल्लाटी रेखियेल्या ऽऽऽ
अहो रेखियल्या नयना ऽऽऽ अहो रेखियल्या नयना ऽऽऽ
गण मुरडीयल्या भुवया ऽऽऽ गण मुरडीयल्या भुवया ऽऽऽ
रंगणी येतो गण नाचावया ऽऽऽ गणेशा रंगणी येतो गण नाचावया ऽऽऽ
अहो रंगणी येतो गण ऽऽऽ अहो रंगणी येतो गण ऽऽऽ
अहो संगे सरस्वती ऽऽऽ अहो संगे सरस्वती ऽऽऽ
ब्रम्ह यांनी पोथी वाचावया ऽऽऽ गणेशा ब्रम्ह यांनी पोथी वाचावया ऽऽऽ
अहो गणेशाचे पुजे ऽऽऽ अहो गणेशाचे पुजे ऽऽऽ
गण काशिच्या कावडी ऽऽऽ गण काशिच्या कावडी ऽऽऽ
त्याला हो आवडी लाडवांची ऽऽऽ गणेशा त्याला हो आवडी मोदकांची ऽऽऽ
अहो लाडू भरले ताटी ऽऽऽ अहो मोदक भरले ताटी ऽऽऽ
गण जेव सख्या सेवैया ऽऽऽ गण जेव सख्या सेवैया ऽऽऽ
संपुर्ण ओवया गणेशाची ऽऽऽ गणेशा संपुर्ण ओवया गणेशाची ऽऽऽ

 
७. आरती केशवराया
पहिली आरती देवां पुस्तके माया । पहिली आरती देवां पुस्तके माया
गरूड गमान गोपाळ राज गे सयान । गरूड गमान गोपाळ राज गे सयान ।
आरती केशवराया राम हरी जोग ॥
हरहर भक्ती करोनी जन्म झाला हरी जोग । जन्म झाला हरी जोग ।
आरती केशवराया राम हरी जोग ॥ १ ॥
दुसरी आरती देवा देवकिनंदना ।दुसरी आरती देवा देवकिनंदना ।
आले किमी राजन देवा कौसल्या मर्दना ।आले किमी राजन देवा कौसल्या मर्दना । आरती केशवराया राम हरी जोग ॥ २ ॥
तिसरी आरती देवा तिरजोग माया । तिसरी आरती देवा तिरजोग माया ।
कालिया नागनाथ देवा मदन गोपाळा । कालिया नागनाथ देवा मदन गोपाळा ।
आरती केशवराया राम हरी जोग ॥ ३ ॥
चवथी आरती देवा चवजागे पुजा । चवथी आरती देवा चवजागे पुजा ।
भक्ती उध्दारोनी म्हणे भाव नाही दुजा । भक्ती उध्दारोनी म्हणे भाव नाही दुजा ।
आरती केशवराया राम हरी जोग ॥ ४ ॥
पांचवी आरती देवा राम जैसे भावे । पांचवी आरती देवा राम जैसे भावे ।
राम जैसा कोण देवा रामनाम घ्यावे । राम जैसा कोण देवा रामनाम घ्यावे ।
आरती केशवराया राम हरी जोग ॥ ५ ॥

 
८. आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा ऽ महाकैवल्यतेजा ऽ सेविती साधूसंत ऽ
मनु वेधिला माझा ऽ वेधला माझा ऽ आरती ज्ञानराजा ॥धृ ॥
लोपले ज्ञान जगी ऽ हित नेनती कोणी ऽ अवतार पांडूरंग ऽ
नाम ठेविले ज्ञानी ऽ आरती ज्ञानराजा ॥१ ॥
कनकाचे ताट करी ऽ उभ्या गोपिका नारी ऽ नारद तुंबर हो ऽ
साम गायन करी ऽ गायन करी ऽ आरती ज्ञानराजा ॥ २ ॥
प्रकट गुह्य बोले ऽ विश्व ब्रम्हची केले ऽ राम जनार्दनी ऽ
पायी मस्तक ठेविले ऽ मस्तक ठेविले ऽ आरती ज्ञानराजा ॥ ३ ॥