कोणी पंढरी हो ऽ कोणी पंढरी गा ऽ पंढरीसी जातां ऽ हो
कोणी पंढरी गा ऽ पंढरीसी जातां माझा निरोप आहे
ऽऽऽ कोणी पंढरीसी जातां माझा निरोप आहे ऽऽऽ
विठाबाई हो ऽ विठाबाई गा ऽ बाई गे माउली ऽ
हो विठाबाई गा ऽ बाई गे माउली साधू संतांची साउली ऽऽऽ
विठाबाई गे माउली साधू संतांची साउली ऽऽऽ
सांवळे पितांबर ऽ हो सांवळे पितांबर ऽ
पितांबर धारी ऽ हो सांवळे पितांबर ऽ
पितांबर धारी गरूडावरी झाली संवारी ऽऽऽ
सांवळे पितांबर धारी गरूडावरी झाली संवारी ऽऽऽ
आनंद होतो हो ऽ आनंद होतो गा ऽ
होतो पंढरपुरी ऽ हो आनंद होतो गा ऽ
होतो पंढरपुरी भानूदास आरती करी ऽऽऽ
आनंद होतो पंढरपुरी भानूदास आरती करी ऽऽऽ
आरती ओवाळी हो ऽ आरती ओवाळी गा ऽ
ओवाळी सर्व देवां ऽ हो आरती ओवाळी गा ऽ
ओवाळी सर्व देवां संतां बाळा गोपाळां ऽऽऽ
आरती ओवाळी सर्व देवां संतां बाळा गोपाळां ऽऽऽ